आपल खान्देश

भारत-बांगलादेशच्या ‘या’ करारात चाळीसगावच्या शिक्षकाचा सिंहाचा वाटा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव- जळगाव) : भारताने जागतिकीकरण स्वीकारले आणि भारतातील बुद्धीचा जगाला देखील उपयोग होऊ लागला. अनेक देशांचे विविध पातळीवर करार होऊ लागले. त्यातच भारत आणि बांगलादेशाचे टेलिकम्युनिकेशन संदर्भातील करार झाले. यात महत्त्वाचे योगदान मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील आश्रम शाळेचे शिक्षक सुनील मोरे यांनी दिले. यांचा नुसता चाळीसगाव तालुक्याला नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नाते कसे आहे. राजकीय पटलावर काय चर्चा करतात? यापेक्षा आपल्या बुद्धीचा वापर करून या दोन्ही देशाचे कम्युनिकेशन चांगले करता येऊ शकते का? या तांत्रिक कामासाठी मोरे यांनी स्वतःच्या बुद्धीचा कस लावला असल्याचे हे येथे महत्त्वाचे ठरते.

स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटर, नाशिकच्या विद्या प्राधिकरण, बांगलादेशाच्या इलमेंट्री एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमानाने भारत बांगलादेश टेली कोलेबोरेशन प्रकल्प २०२१ हा नुकताच राबविण्यात आला. या प्रकल्पात आनुदानित आदिवासी माध्यमिक विद्यालय मेहुणबारे येथील उपक्रमशील शिक्षक सुनिल मोरे यांनी ऑनलाईन सहभाग घेऊन त्यांच्या सोबत बांगला देशातील शिक्षक मिजनुर रहेमान व पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन माहिती जाणून घेतली.

भारत व बांगलादेशातील सहभागी शिक्षकांनी आपापल्या देशातील सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासक व शैक्षणिक माहितीचे पाँवरपाँईंट प्रझेटेशंन फोटो, व्हिडीओच्या साहाय्याने अदान प्रदान केले. युनायटेड नेशन्स आँर्गनायझेशन (युनो) ठरवून दिलेल्या १७ शाश्वत विकासाच्या ध्येय बाबतीत जागरूकता निर्माण व्हावी हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या १७ ध्येयांपैकी भुक निर्मूलन, दारिद्र निर्मूलन, चांगले आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शुध्द पाण्याची उपलब्धता,आणि सांडपाण्याची व्यवस्था, असमनता कमी करणे या विविध महत्त्वाच्या मुद्यांवर १६ सत्रामध्ये ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले व प्रकल्प पुर्ण करण्यात आला. या प्रकल्पात राष्ट्रीय समन्वयक नाशिक डायटचे प्रा. योगेश सोनवणे, वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक प्रा.भरत शिरसाट, यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्प यशस्वी झाल्याबद्दल श्री. मोरे यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव विजय चौधरी यांनी कौतुक केले तर मुख्याध्यापक मुकेश चौधरी व वैभव चौधरी यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे