आपल खान्देश
पाचोरा वे. मि. असो. कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा पाचोरा काॅंग्रेसच्या वतीने सत्कार
Pachora Live24 @ City Reporter
वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा व पाचोरा तालुका वेब मिडिया असोसिएशन घोषीत झाली आहे.

वेब मिडिया असोसिएशन चे वेब पोर्टल चे असलेले पाचोरा पदाधिकारी पत्रकार व संपादक हे दिवस-रात्र हे सर्वांना मोठे करण्यासाठी आपली सेवा देत असतात आणि ते सर्व मंडळीची वेब मिडीया जिल्हा व तालुका असोसिएशन पदी निवड झाली हि आम्हा सर्वांना अभिमानास्पद बाब आहे. काॅंग्रेस तालुकाध्यक्ष सचिनदादा यांनी मोठ्या मनाने आज सर्व वेब मिडीया असोसिएशन चे पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार केले.
यावेळी यांनी सर्वांना पेढे भरवुन व पुष्पगुच्छ आणि शाॅल देऊन तसेच नाश्ता व चहा-पाण्यासोबत स्नेहभोजन हे निसर्गरम्य वातावरण असलेले त्यांच्या शेतात ठेवला होता, सत्कार व सन्मान कार्यक्रम तसेच सर्वांना कोरोना योध्दा म्हणुन केले सन्मानित व अनमोल अशी भेटवस्तु दिली.
यावेळी वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ पाटील व प्रदेश कार्यकारिणी सदस्य योगेशभाऊ पाटील जिल्हा सरचिटणीस गणेश शिंदे व जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर व जिल्हा संघटक नरसिंह भुरे व जळगाव जिल्हा समन्वयक जावेद शेख जळगाव जिल्हा खजिनदार पदी -फोकस न्युज कार्यकारी संपादक भुवनेश दुसाने तालुका अध्यक्ष – एम एन न्युजचे निलेश पाटील उप तालुका अध्यक्ष – तालुका माझा संपादक बंडुभाऊ सोनार उप तालुका अध्यक्ष – सी एन आय महाराष्ट्र दिपक गढरी, तालुका सचिव – झेप इंडियाचे संजय पाटील, तालुका सरचिटणीस – झुम मराठी संपादक दिलीप परदेशी, तालुका समन्वयक – जनलक्ष संपादक प्रमोद बारी, जेष्ठ मार्गदर्शक ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे दिलीप पाटील, या वेब असोसिएशन पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
सर्व निवड झालेले वेब मिडिया असोसिएशन चे पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी पाचोरा सर्व वेब मिडिया असोसिएशन पदाधिकारी यांनी विशेष सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल काॅंग्रेस तालुका अध्यक्ष सचिनदादा पाटील यांचे विशेष आभार मानले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या ८ एकर शेतात लावलेली दर्शनीमोह अशी मोसंबी बागेची माहिती सर्वांना पण दिली. असचं एकजुटीने काम करत असल्याचे सर्वांचे कौतुक केले आहे.यावेळी काॅंग्रेस विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे व सोशल मिडीया सेल चे तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, उपशहर अध्यक्ष गणेश पाटील, भडगाव चे विजय सोनार उपस्थित होते.




