आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
पाचोऱ्यातील शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Pachora Live24 @ City Reporter
पाचोरा(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत वर्ष 2020 21 मध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा या विद्यालयाचे एकूण 12 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी सहा विद्यार्थ्यां या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव संस्थेच्यावतीने शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये नुकताच साजरा करण्यात आला

सदर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 22 जून 20 21 रोजी सोशल डिस्टंसिंग चे पालन करू शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे साजरा झाला . या कार्यक्रमात मुलांनी आणखी प्रगती करावी, स्पर्धा परीक्षांचा चांगला अभ्यास करावा अशा प्रकारचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री तात्यासाहेब शिंदे व संस्थेचे सचिव ऍड जे. डी. काटकर दादा तसेच सहसचिव श्री. शिवाजी शिंदे व संचालक श्री. नीरज मुनोत यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
मुलांच्या या यशाचे खरे शिल्पकार शिंदे इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य डॉक्टर विजय पाटील व स्कूल चे सर्व शिक्षक हे आहेत विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या ह्या कामगिरीवर सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.





