धुळे – पेट्रोल-डीझेल पाठोपाठ इतर गरजेच्या वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामन्यांना जगण कठीण झालं आहे. याच वाढत्या महाघाई विरोधात धुळ्यातील शिरपूर येथील तहसील कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली असून, जनतेने जगायचे तरी कसं असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले. निवेदनातील मागण्या.. यावेळी दिलेल्या निवेदनात, औषधी व जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमती त्वरीत कमी करा, कोवीडची लस पुरेशे प्रमाणात सर्वांना मोफत उपलब्ध करा,घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमती कमी करा. प्रमाणपत्र धारक वन अतिक्रमण धारकांना बँकेकडून पीककर्ज त्वरीत उपलब्ध करून द्या अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजप नेत्यामुळे वैतागले असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी केला आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसनंतर आता तेलाच्या दरात सुद्धा प्रचंड दरवाढ केल्यामुळे याची झळ सामान्य माणसाला बसत असल्याचही शिंदे म्हणाल्यात.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा