महाराष्ट्र

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

अंतीलिया कार बॉम्ब प्रकरण तसंच व्यवसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणात इतर आरोपींच्या जबाबातून प्रदीप शर्मा यांचं नाव पुढे आल्याचा दावा NIA ने केला आहे. त्यानंतर आज सकाळपासून NIA ने प्रदीप शर्मांच्या अंधेरी येथील निवासस्थानाची झडती घेतली व त्यानंतर त्यांना अटक केली. प्रदीप शर्मा यांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून पोलिस दलात ख्याती होती. अनेक महत्वाची एन्काऊंटर्स त्यांच्या नावावर आहेत. संबंधित प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेंशी प्रदीप शर्मा यांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे NIA या प्रकरणात त्यांच्या सहभागाचा धागा शोधत होती. प्रदीप शर्मा यांनी पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती ; परंतु त्यात ते पराभूत झाले होते. विशेष म्हणजे सचिन वाझे यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे