आपल खान्देशमहाराष्ट्र

जळगाव बीएचआर घोटाळा प्रकरणी एकाला पुण्यातून अटक

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यात आज पहाटे सात जणांना अटक केल्यानंतरची कारवाई सुरूच असून पुन्हा चार जणांना अटक करण्यात आली आहे. यात ख्यातनाम कोगटा डाळ उद्योगाचे सर्वेसर्वा प्रेम कोगटा यांचाही समावेश आहे. विशेष बाब म्हणजे कोगटा समूहाच्या आवारातच बीएचआयचे नवीन मुख्यालय आहे. यामुळे या अटकेला विशेष महत्वपूर्ण मानले जात आहे.

याबाबत वृत्त असे की, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. आज पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व अजून एकाला अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे