आपल खान्देशमहाराष्ट्र

परंपरेच्या एक पाऊल पुढे

समाज आणि लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जावून एका तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या ट्रांसजेंडरच्या गळ्यात मित्र आणि घरातील मंडळीच्या उपस्थित वरमाला घालून मंगळसूत्र बांधले. हा आगळावेगळा विवाह सध्या मनमाड शहर परिसरातच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून या नव दाम्पत्याला दोन्ही कडच्या लोकांनी शुभ आशिर्वाद दिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि काही महिन्यातच त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. या विवाहाला दोन्ही परिवाराने संमती देखील दिली. येवला तालूक्यातील मातुलठाण येथे राहणाऱ्या संजय झाल्टे या तरुणाने शिवलक्ष्मीशी वैदिक पध्दतीने विवाह केला. शिवलक्ष्मी या मनमाड येथेच राहणाऱ्या आहेत. नांदगाव तालुक्यातील नागापुर येथील एका प्राचीन शिव मंदिरात या दोघांची लग्नगाठ बांधली गेली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे