आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी भारतीय असल्याचा अधिकृत कायदेशीर पुरावा आहे. यातच युआयडीएआयने आता आधार कार्ड संबंधीत एक सेवा बंद केली आहे. यापूर्वी आधार कार्ड हरवले, खराब झाले किंवा फाटले तर युआयडीएआयच्या अधीकृत वेबसाइटवर जाऊन नवीन आधार कार्डसाठी रिप्रिंटची ऑर्डर देऊन आपल्या रजिस्टर पत्त्यावर मागवू शकत होतात. परंतु आता असे होणार नाही, कारण युआयडीएआयची आधार कार्ड रिप्रिंट ही सेवा आता बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी क्रेडिट कार्डच्या आकाराचे PVC आधार कार्ड दिले जाणार आहे. हे कार्ड आधीच्या आधार कार्डपेक्षा तुलनेने लहान असल्याने खिशात किंवा पॅकेटमध्ये सहज ठेवता येणार आहे. यासंदर्भातील माहिती UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरून माहिती दिली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा