आरोग्य व शिक्षणदेश-विदेश
कोव्हॕक्सिन लस घेणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासबंदी?
कोव्हॕक्सिन लस घेणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासबंदी?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी लसीकरण झालेल्या नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात आपापली धोरणे जाहीर केली आहेत. या नियमांमुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. कारण बहुतांश देशांनी त्यांच्या देशातील नियामक यंत्रणांनी मंजुरी दिलेल्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपतकालीन यादीत असलेल्या लसींचाच वापर ग्राह्य धरला आहे. यामध्ये सिरमची कोव्हिशिल्ड, मॉडर्ना, फायझर, अॅस्ट्राझेन्का (टू), जान्सेन, सिनोफार्म या लसींचा समावेश आहे. परंतु या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश नसल्याने आता ही लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. भारत बायोटेकने संबंधित यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे विनंतीही केली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेकडून लसीच्या परिणामासंदर्भात आणखी माहिती गरजेची असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.




