आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात!!
जळगाव : दुसऱ्या लाटेतील कोविडमुळे उद्भवणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ या गंभीर आजाराने आता थैमान घातले असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक १५ रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले आहेत. जिल्ह्यामधील रुग्णाच्या राज्यातील प्रमाणानुसार या आजारावरील उपचारासाठी ॲम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचा पुरवठा निश्चित करण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत नाही तोच, कोविडमुळे उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या राज्यात झपाट्याने वाढत असून, त्यावरील उपचारासाठी आवश्यक ॲम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचाही रेमडेसिव्हिरप्रमाणे तुटवडा निर्माण झाला आहे.

नाशिक विभागात जळगाव पुढे उत्तर महाराष्ट्रात नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत १८ मेपर्यंत म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्येनुसार त्या प्रमाणात, जळगाव जिल्ह्यासाठी ॲम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचे २५८ व्हायल प्राप्त झाले आहेत




