देश-विदेश

‘लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मागील काही दिवसांपासून भारतात कोरोना विषाणूनं अक्षरशः थैमान घातलं आहे. देशात दररोज लाखो कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर हजारो लोकांचा कोरोनामुळं मृत्यू होतं आहे. तर रुग्णालयात असंख्य कोरोनाबाधित रुग्ण मृत्यूशी लढा देत आहेत. अशा एकंदरित नैराश्यपूर्ण वातावरणात जगण्याची उमेद दाखवणारा एक सकारात्मक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडिओमध्ये एक 30 वर्षीय युवती ऑक्सिजन मास्क लावून मृत्यूशी झगडत  असताना ‘लव्ह यू जिंदगी’ या गाण्यावर थिरकत होती.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. तर अनेकांनी तिच्या सकारत्मकतेचं भरभरून कौतुक केलं होतं. पण या तरुणीची कोरोनापुढं हार झाली आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात संबंधित कोरोनाबाधित तरुणीनं अखेरचा श्वास घेतला आहे. तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. आयुष्यावर इतकं प्रेम करणाऱ्या तरुणीची कोरोनापुढे हार झाल्यानं सोशल मीडियात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यात डॉक्टर मोनिका लंगेह नावाच्या ट्विटर वापरकर्तीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून संबंधित व्हिडिओ शेअर केला होता. डॉक्टर मोनिका यांच्या मते, संबंधित कोरोनाबाधित तरुणीला रुग्णालयात आयसीयू बेड मिळू शकला नाही, म्हणून तिला कोविड इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिला NIV on Invasive Ventilation वर ठेवण्यात आलं होतं. या व्यतिरिक्त रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि प्लाझ्मा थेरपीदेखील देण्यात येत होती.

 

https://youtube.com/shorts/ehCjOS1RDt4?feature=share

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे