आरोग्य व शिक्षण

Pachora | जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थिनीचे आंतरशालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश…

 

पाचोऱ्यात श्री गो से हायस्कूल येथे झालेल्या आंतरशालेय तालुकास्तरीय 14 वर्षा आतील मुला मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश मेडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थिनी कु. लिशा ललित जैन हिने बुद्धिबळ स्पर्धेत चमक दाखवत तिची आंतर शालेय जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे . या स्पर्धेत तालुक्यातील 13 शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता. लिशा ललित जैन या विद्यार्थिनीने सलग चार सामने जिंकून व पाचव्या सामन्यात समोरच्या खेळाडू सोबत बुद्धिबळ खेळाच्या चालीनुसार नियमाने बुद्धीचा उपयोग करून पुढील सामना हा ड्रॉ करण्यात लिशा जैन यशस्वी झाली.

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाचोरा तालुक्यातून तिची 3 ऱ्या स्थानी यशस्वी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी तिला क्रीडा शिक्षक निवृत्ती तांदळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तालुका स्तरावर सर्वांसाठी हा एक अविस्मरणीय सामना या वर्षीचा ठरला. या यशामुळे तिचे संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया,गुलाब राठोड प्रभुलाल शर्मा,गोपाल पटवारी, प्रिती जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव प्रिती शर्मा, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, साविता माळी, रूपाली देवरे, चेतना पाटील, अश्विनी पाटील,भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र,  किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे,संगिता पाटकरी, पुजा अहिरे, शालिनी महाजन, रुक्मिणी कासार,पुजा देसले, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे,अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील, शितल पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे या सर्वांनी लिशा जैन हिचे भरभरून कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे