आपल खान्देशकृषीवार्ता

Pachora | आखतवाड्यात पारंपारीक बैल पोळा..

झूम न्यूज नेटवर्क @ संजय परदेशी

पाचोरा | शेतकरी राजाच्या बैलांचा सन्मान करणारा पोळा उत्सव विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका मधील आखातवाडे गावात बैल पोळा मोठया उत्साह साजरा केला गेला, वर्षा नुवर्षी परंपरा असलेला हा उत्सव ग्रामस्थ आजही तितक्याच उत्साहाने जल्लोषात भावभक्तीने साजरा केला गेला.

बैलपोळा हा सण मुख्यतः शेतकरी वर्गाचा आणि बैलांशी निगडित असलेला सण आहे. भारतात प्राचीन काळापासून शेती हा जीवनाचा मुख्य आधार राहिला आहे. शेतीच्या कामासाठी बैल हे महत्त्वाचे साथीदार मानले जातात. त्यांचा उपयोग नांगरणी, वाहतूक, पाणी ओढणे अशा सर्व कृषी कामांत होत असे. त्यामुळे या प्राण्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे मान देऊन त्यांचा गौरव करण्याची परंपरा रुजली. शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैल हे केवळ जनावर नसून कुटुंबातील सदस्य मानले जातात. शेतीची परंपरा ज्या दिवसापासून सुरू झाली, त्या दिवसापासून बैल शेतकऱ्याचा मुख्य साथीदार ठरला. आजही या नात्याची जपणूक श्रावण अमावास्येला होणाऱ्या बैलपोळा सणातून केली जाते.

शेतात कष्ट करून शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान करणाऱ्या बैलांना या दिवशी सक्तीची विश्रांती आणि सन्मान दिला जातो. याशिवाय, पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदे मळणी करून बैलांच्या खांद्याला तेलाची मालीश करून त्यांचा थकवा घालवला जातो. त्यांना वाहत्या पाण्यात स्वच्छ धुतले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलांना नक्षीदार झूल चढवण्यात येते. अंगावर गेरूचे सुंदर ठिपके मारले जातात. शिंगांना रंगीबेरंगी बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण आणि कासरा चढवला जातो. पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालून बैलांचा विशेष श्रुंगार केला जातो. सजलेल्या बैलाला घेऊन मंदिरात भोवती फिरवले जाते आणि घरी आणून त्याची पूजा केली जाते त्यांना गोड पुरण पोळीचा नैवेद्य खाण्यास दिला जातो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे