बालदिन ठरला ‘तीचा’ शाळेचा अखेरचा दिवस, पहूर येथील चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू!
झूम मराठी वृत्त
पहूर – पहूर कसबे येथील लेले नगर भागात राहणाऱ्या ९ वर्षीय बालिकेचा अचानक पोटात दुखू लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. शाळेचा पहिला दिवस आणि बालदिन तिच्या शाळेचा अखेरचा दिवस ठरला.
दिव्या कैलास बनकर ही ९ वर्षीय चिमुकली जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर लेले नगर शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकत होती. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने ती काल मोठ्या उत्साहाने शाळेत गेली. बाल दिनानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात तिने सहभाग घेतला. मात्र कालचा बालदिन तिचा शाळेचा अखेरचा दिवस ठरला. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास तिच्या पोटात दुखू लागले. आई-वडिलांनी लगेचच तिला गावातील खाजगी रुग्णालयातत नेले . पुढील उपचारासाठी जळगावला नेत असतानाच १० वाजेच्या सुमारास ‘दिव्या’ची प्राणज्योत मालवली.
आज दुपारी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शाळेतील बालमैत्रिणींसह शिक्षक आणि मुख्याध्यापकांनाही गहिवरून आले.


