आपल खान्देश

गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांजवळ बसायचे पण जळगावसाठी निधी आणला नाही, गुलाबराव पाटलांचा आरोप

जळगाव: प्रतिनिधी । जळगाव शहरासाठी 100 कोटी आणू, 200 कोटी आणू अशा वल्गना भाजपनेते गिरीश महाजन करायचे . तेव्हा तर गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोप पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

जळगावच्या विकासावरुन माजी मंत्री गिरीश महाजनांवर त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी 100 कोटी आणू, 200 कोटी आणू अशा वल्गना भाजप नेते गिरीश महाजन यांनी केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी शहराची वाट लावली’, असा घणाघाती आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

जिल्हा नियोजन समितीतून जळगाव महापालिकेला विविध विकासकामांसाठी 61 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. गेल्या काळात पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी. मी एका वर्षात 61 कोटी रुपये देऊ शकतो. तर यांनी काय दिले ते जाहीर करावे.असेही ते म्हणाले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे