महाराष्ट्रातील नेते वेगवगेळ्या माध्यमातून पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर भाष्य करु लागले आहेत.
भाजपकडे राज्यातील नेतृत्व करणारा नेता नव्हता. भाजपला चपराक बसली आहे असे महाराष्ट्राचे पाणी पूरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रया व्यक्त केली. ते म्हणाले काेणाचा करिष्मा आहे यापेक्षा राज्याचा विकास आणि राज्य मातीशी काेण जुळला आहे याला महत्व जास्त आहे.
माेदींकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे गेलेले नेते काेण हाेते ते सर्वांना माहित आहे. ज्यांच्याकडे अपत्य नव्हती तीच अपत्य ममतांची पळवली हाेती. त्यामुळे लाेकांनी ही हुशारी दाखवली आहे. लाश वही है सिर्फ कफन बदला गया आहे. लाेकांनी या गद्दारीला सुद्धा चपराक दिली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा