धनगरांनो.. त्यांच्या मंत्रीपदाच्या गिनतीत तुम्ही नाही, तुम्ही त्यांना तुमच्या मतांच्या गिनतीत ठेवू नका..
नव्या सरकारचा ताटकळलेला मंत्रीमंडळ विस्तार १८ मंत्र्यांच्या शपथविधीने संपन्न झाला. कुणाकुणाची वर्णी लागेल याचे बांधलेले अंदाज किमान धनगर जमातीसाठी तरी फोल ठरले.१८ त तुमचा का नंबर लागला नाही? का? मुख्यमंत्री गटात नंबर लागणे, दुरान्वयानेही शक्य नव्हते, निम्मे वजा झाली, भारतीय जनता पक्षा कडून आशा होती, पण पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या बीजेपी स्ट्रॅटर्जीत तुम्ही बसला नाही. (विधानसभेत निवडूण आलेले) आपले तिनही विधानपरिषदेवर, त्यामुळे पहिल्या टप्प्यात नंबर लागला नसावा/नाही ?
मग, अशा टप्प्यात नंबर लागण्यासाठी तुम्हास जनतेतून/लोकमतातुन प्रतिनिधित्व द्यायला हवे. तुम्हास ते कायम गृहित धरतात. जितक्या वेळा गृहित धरतात तितक्या वेळा आपण ते त्यांचे गृहित सिद्ध करतो. आणि मग, ते काय देणेची वेळ येते तेव्हा दगाबाजी करतात, ह्या दगाबाजीस कोण प्रखर विरोधही करत नाही, त्यातुन काहीजण विरोध प्रकट करतात. त्यांना माहित आहे विरोध करणारे आमचे पक्षाचे पठीराखे नाहीत, त्यांच्या विरोधास काय जुमानायचे.
खर तर, धनगर जमातीवरील कोणत्याही आश्वासित प्रश्नासाठी पक्षातील धनगर नेतृत्वाने आवाज उठवावयास हवा, दुदैवाने तसे होताना दिसत नाही, ती मंडळी पक्षाचे ध्येयधोरणाशी चिकटून बसतात, त्यात स्व बरोबर जमातीचीही हानी करुन घेतात. आज, मंत्रीमंडळ विस्तारात डावलले. ज्यांचेवर वेगवेगळे आरोपांचा ससेमिरा आहे त्यांची वर्णी लागते मात्र १७% मतदार संख्या असलेल्या धनगर जमातीकडे दुर्लक्ष केले जाते..
यासाठी आपली मतदान जागृती व्हावयास हवी. ती मतदान जागृती “धनगर जमात मतदान जागृती अभायान” राबवून करावयास हवी, त्यांना तुमचे मतापासून एक बोट दूर ठेवा. आपोआपच त्यांच्या मंत्रीपदाके काय तर मुख्यमंत्री पदाचे रेसमध्ये याल. आपल्या जमातीच्या कोणत्याही सामाजिक कार्यक्रमातून हि “मतदान जागृती” करावयास हवी. मतदाराची पहिली आणि शेवटची पसंती आपलाच उमेदवार असला पाहिजे. या एका बाबीवर तुम्हास उमेदवारीही मिळेल, आधासी डोळ्यांंनी जेपीबीतून गुलाला उधळताना पाहिले.. तो तुम्ही तुमचेसाठी उधळताना पाहाल. (तुमचा पराघय तिथं प्रस्थापिताने जरा जास्तच गुलाल उधळळला,) याचेही शल्य असावयास हवे. धनगर जमात मतदान जागृती अभियान बाबत केडरकँप घेवू.
निवांत कोळेकर सर, सांगली मोबाईल 8329665901
पेरियार प्रबोधनी
Disclaimer : वरील लेख एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. झूम मराठीच्या टीम अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व #झूम मराठी स्वीकारत नाही.
___________________________________________




