गुन्हेगारी

Nashik Crimes | अंबड परिसरात खळबळ!,जन्मदात्याने घाेटला मुलीचा गळा!


नाशिक (मुक्ताराम बागुल) नाशिक शहरातील अंबड लिंक रोड चिंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात जन्मदात्या बापाने ओढणीने गळा दाबून आपल्या मुलीचा खून केले की धक्कादायक घटना घडली असून त्या घटनेनंतर परिसरात एकच उडाली आहे. 

 याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड लिंक रोड चिंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात वारंवार किरकोळ कारणावरून मुलगी घर सोडून जात असल्याचा संताप अनावर झाल्याने,तिथे पित्यानेच आपल्या मुलीचा गळा आवळुन खून केल्याची घटना घडली. एक्सस्लो पॉईंट जवळील रामकृष्ण नगर येथील रहिवाशी राम किशोर भारती वय वर्ष 45 याने आपल्या राहत्या घरी मुलगी ज्योती राम भारती वय वर्षी 24 ही घरात झालेल्या किरकोळ कारणाच्या भांडणावरून नेहमी घर सोडून निघून जात त्याचा तिच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होत होता. तिचे वडील राम किशोर भारती यांचा राग अनावर झाल्याने त्याने आपल्या राहत्या घरात मुलगी ज्योती हिचा गळा आवळून खून केल्याची संशायास्पद घटना घडली. सदर घटनेची दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी मंगळवारी सकाळी माहिती मिळताच पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक आयुक्त सोहेल शेख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक किरण शेवाळे, उपनिरीक्षक नाहीत शेख आदी पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. 

याप्रकरणी संशयित आरोपी राम किशोर भारती यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे