मुलुंडयेथे धनगर समाज संघर्ष समिती पदाधिकारीचां मेळावा मोठया उत्साहात संपन्न
मुलुंड (झूम मराठी) मुलुंड येथे माजी खासदार डॉ.विकासजी महात्मे यांच्या अध्यक्षते खाली लोकसभा निवडणुकी संदर्भात धनगर समाज संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित केलेली होती. राज्यातून मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थिती होते.
मुलुंड येथे धनगर समाज संघर्ष समिती पदाधिकारी व धनगर समाज बांधव यांनी येण्याऱ्या निवडणुकीत आपले अस्तित्व तयार करण्या साठी सज्ज राहावे आपल्या विभागातील उमेदवारांना जाणीव करून द्यावी की आपल्या मतदार संघात आमचे ही मतदान आहे. शासनाने लागू केलेल्या योजनाची माहिती समाज बांधवां पर्यंत पोहचवावी व सदर योजनाचा लाभार्थीना लाभ मिळवून दयावा, त्याच बरोबर आपला समाज एकगठ्ठा मतदान कसे होईल याचे लक्ष ठेवा असे या मेळाव्यात बोलतांना डॉ.विकासजी महात्मे सांगीतले.
सदर बैठकीत शिवाजी दगडू खरात (ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष), अमोल बाळासाहेब गावडे (ईशान्य मुंबई युवा जिल्हाध्यक्ष), राजेंद्र पांढरे (मुलुंड शहर अध्यक्ष), नितीन सर्जेराव ठोंबरे (ईशान्य मुंबई युवा सचिव), दिनेश कुमार केदारनाथ पाल (मीरा भाईंदर शहराध्यक्ष), सुरेश जयसराज यादव (अंधेरी शहर अध्यक्ष) यांची पदी नियुक्ती करण्यात आली तसेच ठाणे/ नवी मुंबई /मुंबई येतील पदाधिकारीची संख्या वाढवून नवीन नेमणूक करण्यात आल्या.
प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप माने, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम यमगर, राजाराम देवकते साहेब यांच्या सह इतर पदाधीकारी उपस्थित होते.




