पाचोऱ्यात जळगाव जिल्हा मनसे पदाधिकारीचां मेळावा मोठया उत्साहात संपन्न..
पाचोरा (झूम मराठी ऑनलाईन) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पाचोऱ्यात मोठया उत्साहात पार पडला.
लोकसभा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा जळगांव लोकसभा कार्यकर्ताचां भव्य मेळावा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, मनसे नेते आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा येथील भडगाव रोडवरील स्वामी लॉन्स मध्ये आयोजित करण्यात आला होता. लोकसभा निवडणूकित मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत सामील झाल्याने जळगाव जिल्ह्यात आपली ताकद स्थानिक उमेदवाराला दाखवने गरजेचे आहे असे राज ठाकरे यांच्या मार्गदर्शन नुसार पदाधिकारी या मेळाव्यात सांगण्यात आले.
यावेळी जमील भाई देशपांडे जिल्हा अध्यक्ष, अनिल वाघ जिल्हा अध्यक्ष, मुकुंदा रोटे जिल्हाध्यक्ष, प्रज्वल चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत पाटील, अनिल बागुल जिल्हा उपाध्यक्ष विनोद शिंदे महानगर अध्यक्ष किरण तळेले महानगर अध्यक्ष, आशिष सपकाळे, ज्ञानेश्वर ठाकरे तालुका अध्यक्ष पाचोरा, भालचंद्र पाटील तालुका अध्यक्ष चाळीसगाव, विशाल सोनार तालुका, सागर पाटील तालुका अध्यक्ष भडगांव, अध्यक्ष एरंडोल ऋषिकेश भोई शहराध्यक्ष पाचोरा, सुनील पाटील भडगांव शहराध्यक्ष, कृष्णा दुंदुले जील्हाउपध्यक्ष विद्यार्थी सेना, जितेंद्र नाईक, यश रोकडे, रोहित पाटील, हर्षल अहिरे, वाल्मीक जगताप, आदी पदाधिकारी उपस्थित होते.



