महाराष्ट्र

धनगर समाज संघर्ष समिती पदाधीकारी यांचा मुंबई सामाजिक सवांद साधत केला दौरा..


लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचे अस्तित्व तयार करण्यासाठी सज्ज राहावे आपल्या विभागातील उमेदवारांना जाणीव करून द्यावी की आपल्या मतदार संघात आमचे ही मतदान आहे यासाठी धनगर समाज संघर्ष समिती पदाधीकारीनीं  सामाजिक दौरा केला, समाज बांधवांबरोबर सवांद साधला.

पद्मश्री मा. खासदार, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विकास महात्मे साहेब यांच्या सूचनेनुसार धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी यांनी उत्तर मुंबईतील दहिसर, चारकोप, बोरिवली, कांदिवली, मीराभाईंदर यां ठिकाणी धनगर समाज बांधवासाठी सामाजिक दौरा केला, समाज बांधवांबरोबर सवांद साधला, समाजासाठी लागू केलेलेल्या योजनाची माहिती दिली, त्याच्या समस्या देखील जाणून घेतल्या व साहेबांसोबत बोलणे करून दिले. डॉ विकासजी महात्मे स्वतः समाज बांधवाना भेट देणार आहेत.

प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप माने. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अंकुशजी उगडे, मुलुंड विभाग प्रमुख अमोल गावडे, दिनेश पाल, सागर पाल इ. सहभाग घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे