ब्रेकिंगमहाराष्ट्र
व्हिडीओ -भाजीपाला दोन मिनिटांत फ्रेश? काळं सत्य आलं समोर
Dilipjaypardeshi @ Zoommarathinews
दोन मिनिटात भाजीपाला फ्रेश कसा होतो?
बाजारात मिळणारा फ्रेश भाजीपाला पाहून लगेच हुरळून जाऊ नका. कारण, डोळ्यांना दिसणाऱ्या ताज्या भाजीपाल्यांमागे भयंकर गोष्टी दडलेल्या असू शकतात. जाधवपूर विद्यापीठात झालेल्या संशोधनातून हे काळं सत्य समोर आलं आहे. जाधवपूर विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक उत्पल रायचौधरी म्हणतात: ‘कच्ची फळं आणि भाज्यांचा वापर आता धोकादायक होत आहे.
फ्रेश भाजीपाला पाहून लगेच हुरळून जाऊ नका
त्यामागील काळं सत्य बघा व्हिडीओ pic.twitter.com/XOImsCIMjD— ZOOM MARATHI (@DileepPardeshi) July 22, 2021
भाज्या ताज्या दिसण्यासाठी रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने यामधील पौष्टिक घटक नष्ट होत आहे. भाजीपाला आणि फळांचा रंग आणि ताजेपणा वाढविण्यासाठी कॉपर सल्फेट, र्होडॅमिन ऑक्साईड, मालाकाइट ग्रीन आणि प्राणघातक कार्बाईड ही रसायने सामान्यत: वापरली जातात. हे न्यूरोटॉक्सिक (मेंदूवर परिणाम करणारे) आहेत. ज्यामुळे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश असे आजार होण्याची शक्यत आहे. अशा रसायनांमुळे कन्सरचाही धोका होण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे.
व्हिडीओची सत्यता काय?
आम्ही या व्हिडीओची सत्यता तपासली असता हा व्हिडीओ सत्य असून यामध्ये कोणतीही एडिटींग किंवा छेडछाड केलेली आढळली नाही. मात्र, या व्हिडीओमधील भांड्यात कोणतं रसायन वापरलं आहे? आणि त्यामुळे आरोग्याला किती धोका आहे? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याचीही अधिकृत माहिती आमच्याकडे अद्याप उपलब्ध झालेली नाही.




