आपल खान्देशराजकीय

लोहारा येथील शेकडो तरुणांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटात केला प्रवेश…

  • झूम मराठी @ दिलीप राजपूत

लोहारा, ता.पाचोरा येथे काल दि.29 रोजी संध्याकाळी गावातील अनेक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे..या वेळी कारण म्हणजे शेतकऱ्यानी घाम गाळून काढलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे, तरुणांना रोजगार नाही, वाढती महागाई, बेरोजगारी , पक्ष फोडाफोडी असे अनेक समस्यानी ग्रस्त असलेल्या तरुणांनी भविष्याचा विचार करून निर्णय घेतला असल्याचे अनेक तरुणांनी यावेळी सांगितले. तसेच गावातील अनेक तरुणांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. या वेळी लोहारा गावातून तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रणेश क्षीरसागर यांची लोहारा गाव अध्यक्ष निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.

या प्रसंगी मा.जिल्हा परीषद सदस्य डी. के. दादा पाटील, महीला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ मनोहर दादा पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, रमेश दादा पाटील, कळमसरा सरपंच अशोक दादा चौधरी, प्रल्हाद बोरसे, जामनेर युवक तालुकाध्यक्ष रुपेश पाटील, किशोर खोडपे, डॉ प्रशांत पाटील, आशिष पाटील सर, विश्वजीत पाटील, लोहारा गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते,

यावेळी तरुणांनी आम्ही कोणत्याही अमिषाला आम्ही बळी पडणार नाही असा निश्चय पक्का केला. आम्ही सर्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांचा पाठी मागे खंबीर पणे आहोत असा विश्वास दिला यावेळी तरुणांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण दिसून आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे