आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

Jalgaon | शिरसोलीत दगडफेक : नागरिकांसह होमगार्ड जखमी

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया | जळगाव 

शिवजयंतीनिमित्त सुरु असलेल्या मिरवणकीतील वाहनाच्या धक्क्याने प्रार्थनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरा तुटला. त्यामुळे समाजकंटकांनी मिरवणुकीवर तुफान दगडफेक केल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे घडली. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले असून यामध्ये दोन होमगार्डचा समावेश आहे. सुमारे वीस मिनिटानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी दहा ते बारा संशयितांना ताब्यात घेतले असून याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती निमित्त मिरवणुक काढली जात असते. यंदा देखील गुरुवारी दि. २८ मार्च रोजी देखील संध्याकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर येथून मिरवणूक भव्य मिरवणुक निघाली होती. ही मिरवणुक रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक वराड गल्ली येथे पोहचली. याठिकाणी मिरवणुकीतील वाहनाचा एका प्रार्थनास्थळाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला धक्का लागला. यामध्ये तो कॅमेरा तुटल्यामुळे अवघ्या काही मिनिटात समाजकंटकांनी दगडफेक सुरु केली. मिरवणुकीवर होणाऱ्या तुफान दगडफेक् झाल्यामुळे पळापळ झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये विशाल दिलीप पाटील (वय २५, रा. शिरसोली), घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह पाच ते सहा तरुण व दोन होमगार्ड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक रुग्णालयात दाखल करीत उपचार करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे