सखी

नव्या वर्षातला पहिला उत्सव, सावित्री उत्सव..


३ जानेवारी हा सावित्री बाई फुले यांचा जन्म दिवस….

शेणा, दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुढे नेण्याची अवघड वाट सावित्री माई चालत राहिली म्हणूनच आज महिलांच्या प्रगतीची प्रशस्त वाट तयार झाली….

या वाटेवरून चालताना सावित्री माईची आठवण तर जागवायलाच हवी. त्याची सुरुवात स्वतः पासून, स्वतःच्या घरापासून करूया, दारात कंदील, दरवाज्याला फुलांचे तोरण, घरासमोर रांगोळी, घरात गोडधोड आणि उंबऱ्यावर ज्ञानाची एक पणती लावून, सोबत एक पुस्तक विकत घेऊन ‘ ‘सावित्री उत्सव” घराघरात साजरा करूया, आणि संध्याकाळी आपल्या भागात होणाऱ्या सावित्री उत्सवात सहभागी होवूया. आपण जिथे रहाता तिथल्या मित्रं, मैत्रिणी, शेजारी, कुटुंबीय यांना सोबत घेऊन तिथल्या सोयीच्या ठिकाणी, गच्चीवर, कुणाच्या घरात एकत्र जमून, सावित्रीबाईंच्या आठवणी जागवूया. त्यांच्या कामामधून प्रेरणा घेवूया… 

या दिवशी अनेक जण घरात “सत्य सर्वांचे आदिघर” हा अखंड सामुदायिकरित्या गातात, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन करतात. अनेक स्त्रिया सावित्रीबाई जशी कपाळावर ‘आडवी चिरी’ (कुंकू) लावायच्या तशी चिरी लावून ऑफीस, शाळा, कॉलेज मध्ये जात असतात. लोकल ट्रेन, बस, आपली कार्यालये येथे चाफ्याचे, गुलाबाचे फुल देवून सावित्री बद्द्ल कृतज्ञता व्यक्त करतात. आपल्या परिसरातील वेगळं आणि चांगलं काम करणाऱ्या स्त्रीला बोलावून तिला “सावित्रीच्या लेकी पुरस्कार” देवून गौरवितात. तिचे अनुभव, तिची मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम आदीचे महाराष्ट्रभर या दिवशी आयोजन करण्यात येते. 

सावित्रीबाई सारखे चिरी लावलेले व्यक्तिगत, सामूहिक काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकले जातात. उंबऱ्यावर ‘ज्ञानाची पणती ‘ लावतानाचे फोटोही पाठवतात. अनेक वर्तमानपत्र त्यातले काही निवडक फोटो प्रसिद्धीलाही देतात. तुम्हीही यातील जे शक्य आहे ते करू शकता.

चला तर सगळे मिळून घराघरांतून सावित्री उत्सव साजरा करूया….

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे