महाराष्ट्र

राज्यातील धनगर समाजासाठी तयार केलेल्या विविध योजना विषयी आढावा बैठक माजी खासदार डॉ विकास महात्मे यांच्या उपस्थितीत संपन्न

नाशिक विभागीय कार्यालयात माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी नाशिक विभागीय कार्यालयात धनगर समाजाच्या प्रतिनिधी सोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. सदर आढावा बैठकीत प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर साहेब नांदगावकर साहेब, शशिकांत पाटील साहेब व त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकारी त्याच्यासोबत चर्चा करण्यात आली.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंत निवासी शिक्षण मोफत असून सदर योजना नाशिक, जळगाव,नगर येथे सुरू आहेत उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार मध्ये का सुरू करण्यात आले नाही? याबद्दल अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यांनी सविस्तर आकडेवारी सह माहिती दिली, लवकरच धुळे व नंदुरबार येथे सुद्धा शाळा सुरुवात करण्यात येईल असे सांगितले

नाशिक जिल्हा 2 शाळा 300 विद्यार्थी, जळगाव 2 दोन शाळा 550 विद्यार्थी, अहमदनगर 4 शाळा 400 विद्यार्थी, धुळे 00 विद्यार्थी, नंदुरबार 00 विद्यार्थी, एकूण 1250 विद्यार्थी सध्या लाभ घेत आहेत.

घरकुल योजना विषयी समाज बांधवांमध्ये संभ्रम असल्यामुळे त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली धनगर समाजासाठी घरकुल योजना स्वतंत्र असून सदर अर्ज ग्रामपंचायत मार्फत सामाजिक कल्याण विभागात पाठवण्याचे आव्हान त्यांनी केले व समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले.

बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वस्तीगृहात नंबर लागले नसतील त्याना स्वयम योजने अंतर्गत रोखीने अनुदान आहे. जिल्ह्यातील सामाजिक कल्याण विभागात जाऊन सविस्तर चौकशी करून अर्ज सादर करावेत त्यांनी या योजनेचा जरूर फायदा घ्यावा काही अडचण असली तर कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच 100 मुला मुलींचे निवासी वस्तीगृहासाठी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन त्यांनी केले, वसतिगृहचे सुभेदार मल्हार होळकर असे नामांकन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत दहा लाखापासून ते एक कोटी पर्यंत कर्ज मिळू शकते या योजनेचा ही वैयक्तिक महिलांना फायदा होऊ शकतो होतकरू महिलांनी पुढे येऊन प्रस्ताव सादर करावेत असे त्यांनी सांगितले, अशा अनेक योजनांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली अनेक समाज बांधवांनी समोरासमोर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले अधिकाऱ्यांनाही समाधानकारक उत्तर दिले, स्कॉलरशिप संदर्भात उत्तर महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयाशी संपर्क करून लवकरच कार्यशाळा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही अडचण किंवा तक्रारी असल्यास कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन केले, काही योजना पशु व दुग्ध विभागाशी संबंधित असल्यामुळे त्यांची देखील स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.

सदर बैठकीची प्रस्तावना धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी यांनी केले सदर बैठकीस उत्तर महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व समाजसेवक यांचा सह खालील मान्यवर उपस्थित होते डॉ विकास महात्मे, ज्ञानेश्वर परदेशी, विठ्ठलभाऊ मारनर, बापूसाहेब शिंदे, सचिन मार्तंड, नवनाथ शिंदे, योगेश पानसरे, बंडू कुवर, वाल्मीक खांडेकर, भाऊसाहेब ओहळ, डॉ तुषार चिंचोरे, समाधान बागल, नविनीत वजीरे, सुदाम आण्णा लोंढे, नाना मोगरे, देवचन्द साबळे, बाबुराव हिगे, आबासाहेब टरपले, दिपक सुडके, हेमंत शिंदे, प्रजल पानसरे, योगेश सरोद, दुकले बाबुराव, विलास बिडगर, प्रल्हाद केसकर, रुपेश भाऊ शिंदे, अरुण भाऊ गिरजे, मनोहर परदेशी, ठेंगे साहेब, किरण थोरात, योगेश सरोदे, यांचा सह उत्तर महाराष्ट्रातील विविध संघटना पदाधिकारी, समाज सेवक, समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे