आपल खान्देशब्रेकिंग

Shinde Vs Thackeray : शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का, पाचोरा शहरातील दोन पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल..

पाचोरा भडगावच्या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या समजल्या जाणाऱ्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वाढदिवसा नंतर “गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता” या अभियानाची सुरुवात मोठया उत्साहात झाला त्या नंतर दोन दिवसांनी पाचोरा शहरातील दोन मातब्बर नेत्यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात समिल झाल्यामुळे पाचोरा शहरात ठाकरे गटाची ताकत कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे रण आतापासूनच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्ष प्रवेशांचे सोहळे होत आहेत. यातच वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानंतर ” गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता” या अभियानाची सुरुवात मोठया उत्साहात वाढदिवसाच्या मुहूर्तावर झाला त्या नंतर दोन दिवसांनी पाचोरा शहरातील माजी नगरसेवक दत्ता जडे आणि युवासेनेचे जितेंद्र जैन यांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का असून हा प्रवेश आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

 


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे