आपल खान्देशब्रेकिंगराजकीय

Big Breking : पाचोरा भडगाव मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर….


  • दिलीप जय परदेशी

पाचोरा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपूर्वी दत्त जयंतीचे औचित्य साधत नगरपालिकेचे सलग तीन वेळा नगरसेवक व विविध समित्यांचे माजी सभापती पद भूषविलेले दत्तात्रय जडे तसेच युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जैन यांनी आमदार किशोर पाटील यांचेवर विश्वास ठेवत शिंदेंच्या शिवसेनेत पुर्नप्रवेश केला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात होता.

मात्र यापेक्षाही मोठा धक्का शिवसेना शिंदे गटाला देण्याच्या तयारीत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी असल्याची माहिती समोर आली आहे. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पाचोरा भडगाव मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदार किशोर पाटील आणि शिंदे गटासह भाजपला हा मोठा धक्का मानला जाणार आहे.

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे रण आतापासूनच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्ष प्रवेशांचे सोहळे होत आहेत. यातच वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानंतर ” गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता” या अभियानाची सुरुवात मोठया उत्साहात सुरु आहे त्यातच 

मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना…

पाचोरा भडगाव मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी काल रात्रीच मुंबईकडे रवाना झाले असून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांच्यासह भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे