जळगाव जिल्ह्याला आज सकाळी भूकंपाचे झटके बसले
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात आज सकाळी १०.३५ च्या सुमारास भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहेत. दरम्यान, भूकंपामुळे कुठे नुकसान किंवा हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. तसेच हतनूर धरणाला काहीही धोका नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्याला शुक्रवारी सकाळीच भूकंपाचे झटके बसले आहेत. भुसावळ, सावदा परिसरात आज सकाळी १०.३५ च्या सुमारास ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके जाणवले आहेत. उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. भूकंपाचे धक्के बसल्याने काहीसं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने काहीशी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप नेहमीच होत असतात मात्र शुक्रवारी सकाळी खराखुरा भूकंप झाला आहे. नाशिक शहरापासून २७८ किलोमीटर अंतरावर म्हणजेच भुसावळ, सावदा परिसरात भारतीय प्रमाण वेळ सकाळी १०.३५ वाजता भूकंपाचे झटके जाणवले आहेत. नाशिक केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल तीव्रता नोंदवण्यात आली आहे.
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन
आज सकाळी 10.35 वा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. (MG3.3) नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी. असे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव यांनी केले आहेत.



