आपल खान्देशमहाराष्ट्र

नांदगाव तालुक्यातील जातेगावच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रमात चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचे दुर्दैवी मृत्यू ,


नांदगाव (मुक्ताराम बागुल) नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ वय वर्ष 15 इयत्ता नववी हिचे दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवारी शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर सालाबाद प्रमाणे जातेगाव येथील ग्रामपालिकेच्या ध्वजारोहणासाठी जात असताना सुरू असलेल्या प्रभात फेरी दरम्यान वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत असताना . चक्कर येऊन पडल्याने पूजा वाघ हिला तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. तुझ्या हिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप जायभार यांनी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले असता वाटेयच तिचे निधन झाले. 

 याबाबत पूजा हिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिला जन्मापासूनच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिची तपासणी केली असता तिच्या फुफुसाला त्रास होत असल्याचे सांगितले होते. त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. परंतु तिचे शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच निधन झाल्याने जातेगाव जातेगाव सह नांदगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. तिच्यावर शोकाकुल वातावरणात जातेगाव येथील स्मशानभूमीत 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवारी बारा वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.   विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात म्हणून शक्य तितकी मदत तिच्या पालकांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत असलेले सर्व नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम वरील घटनेमुळे रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे