आपल खान्देशसखी

आमदार किशोरआप्पा पाटील युवा फाउंडेशनच्या हळदी कुंकूला महिलांचा उदंड प्रतिसाद..

संगीतमय मेजवाणीसह विविध खेळांचा महिलांनी लुटला मनमुराद आनंद

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

दिलीप जय परदेशी 

पाचोरा (झूम मराठी) आमदार किशोरआप्पा पाटील युवा फाउंडेशन पाचोरा आयोजित मकर संक्राती निमित्त महिलांसाठी माजी नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील यांच्या संकल्पेनेतून हळदी कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला असता पाचोरा शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.

मकर संक्रांतीचे औचित्य साधत पाचोऱ्यात आमदार किशोर अप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील व बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने महिला भगिनींसाठी ‘मान हळदी कुंकुवाच्या सन्मान सौभाग्याचा ‘अशी टॅग लाइन वापरत हळदी कुंकवाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.

पाचोरा शहरातील व तालुक्यातील महिला आघाडी उपस्थित होत्या व या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहरातील महिला आघाडी, आमदार किशोरअप्पा पाटील युवा फाउंडेशन व शहरातील पदाधिकारी वर्गाने सहकार्य केले. यावेळी माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, सुमीत पाटील, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर, प्रविण ब्राह्मणे, मयुरी बिल्दीकर, उर्वशी गोहिल, महानंदा पाटील, उर्मिला शेळके, किरण पाटील, सीमा महाजन, श्वेता ततार यांचेसह युवासेनेचे समाधान पाटील, नितीन चौधरी, मोहित राजपूत, भूषण पाटील, बंडू सोनार यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.



बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे