आपल खान्देश
मनमाड विभागीय उपाधिक्षक समीरसिंग साळवे यांचे मनमाड शहरातून कौतुक..
नांदगाव (नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल ) तालुक्यातील मनमाड शहराचे कर्तव्यदक्ष मनमाड विभागीय उपाधीक्षक समीरसिंग साळवे यांना नुकताच केंद्रीय गृहमंत्र्याद्वारे दिला जाणारा आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनमाड शहरातून सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच मनमाड शहरामध्ये आपली एक वेगळी छबी निर्माण करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी असून अशी त्यांची ओळख आहे.
तसेच समीरसिंग साळवे एक अशी व्यक्ती महत्व आहे की, त्यांचे कौतुक करणे तितकेच कमी आहे. आज पर्यंत मनमाड शहरात गुन्हेगारीला किंवा इतर कोणतीही गोष्टी ने मनमाड मध्ये डोक्यावर काढले नाही अशी त्यांची ओळख आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.




