आपल खान्देशराजकीय

नांदगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी जाहीर 


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नांदगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण चौक येथे वंचित बहुजन आघाडी शहराच्या वतीने सर्व नूतन वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष पदी बाळासाहेब बोरकर यांची निवड करण्यात आली आहे. 

अँड. आम्रपाली निकम यांची वंचित बहुजन आघाडी मनमाड शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून वसंत भाऊ निकम वंचित बहुजन आघाडीच्या नांदगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. रंजीत अहिरे वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव, अविनाश केदारे वंचित बहुजन आघाडी नांदगाव शहर अध्यक्ष, राहुल पगारे वंचित बहुजन आघाडी शहर सचिव, आदींची निवड करण्यात आली. 

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर व सर्व कार्यकारिणीचे सहर्ष स्वागत व सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी नांदगाव शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आले.  यावेळी संतोष गुप्ता तालुकाप्रमुख शिवसेना ठाकरे गट, श्रावण आढाव नांदगाव शहर अध्यक्ष शिवसेना ठाकरे गट, शरद बागुल वंचित बहुजन आघाडी नांदगाव शहर सचिव , तसेच सामाजिक कार्यकर्ते जितू बागुल, प्रवीण गरुड, आकाश साळवे, सुमित निकम, दीपक कळमकर, हेमंत जगताप, किरण मोरे आधी सर्व कार्यक्रमाचे वेळी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे