आपल खान्देशमहाराष्ट्र

वरखेडी रस्त्यावर दोन दुचाकींच्या अपघातात एक जागीच ठार

 

पाचोरा प्रतिनिधी ।  पाचोरा ते वरखेडी दरम्यान दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होवुन या अपघातात एक जण जागीच ठार  तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे तपास करीत आहे.

२६ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास वरखेडी दरम्यान जय गुरुदेव इंडस्ट्रीज वेअर हाऊस जवळ वरखेडीकडून  पाचोरा कडे येणारी मोटरसायकलला (क्रं. एमएच १९ बीसी ४८८६) पाचोऱ्या कडुन वरखेडी कडे भरधाव वेगात जाणारी हिरो डिलक्स मोटरसायकलने (क्रं. एम. एच. २० ई. यु. ९२२९) जोरदार धडक दिली. यात जिवलाल सुकदेव आढारे (वय – ५४) रा. कायखेडा ता. जामनेर यांचा जागीच मृत्यू झाला. तर बबलु पुंडलिक माळे (वय – ३८) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी बबलु पुंडलिक माळे यांचे फिर्यादीवरून मोटरसायकल चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे