जळगांव जिल्ह्यातील एकमेव खेळाडू प्रिया पाटील,दिल्लीतील कंबोडिया इंटरनॅशनल पॅराऑलिम्पिक गेम्ससाठी निवड
दिलीप जय परदेशी.
पाचोरा (प्रतिनिधी) जळगांव मधील पाचोरा तालुक्यातील एकमेव खेळाडू प्रिया शंकर पाटील ह्यांची दिल्लीतील कंबोडिया इंटरनॅशनल पॅराऑलिम्पिक गेम्ससाठी निवड झाली असून दिनांक ६ जानेवारी व ७ जानेवारी २०२३ रोजी ५ वी राष्ट्रीय दिव्यांगजन गेम्स चे आयोजन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या निवडीने पाचोरा तालुक्यात प्रिया पाटील यांच्यावर शुभेच्छाचां वर्षाव होत आहॆ.
राष्ट्रीय दिव्यांगजन गेम्स चे आयोजन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथील स्पर्धेत लांबउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक अशा अॅथलेटीक्स क्रिडा प्रकार असुन यामध्ये महाराष्ट्रातील २८ दिव्यांग खेळांडुचा समावेश आहे. जळगांव जिल्ह्यातील एकमेव खेळाडू प्रिया शंकर पाटील हिचा १० ते १२ फेब्रुवारी कंबोडिया इंटरनॅशनल पॅराऑलिम्पिक गेम्स २०२३ साठी निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली या राज्यातील अॅथलेटीक्स दिव्यांग खेळाडु संघाचा सहभाग आहे. सदर सर्व खेळाडू हे ए. टी. टी. एफ. जळगांव या संस्थेचे खेळाडू असुन या खेळाडुंना नाशिक येथील प्रशिक्षक खंडु कोटकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.




