ब्रेकिंग

जयकिरण प्रभाजी इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थी शतायु कुळकर्णी याने BBCI विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये तब्बल २२ बळी घेतले.!

पुढील सामने खेळण्यासाठी चैन्नई येथे रवाना होणार असून त्याच्या या कामगिरीचा शाळेकडून त्याची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्याचा केला सत्कार..

पाचोरा (झूम वृत्त) महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात, बीसीसीआय अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना जयकिरण प्रभाजी इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थी शतायु कूळकर्णी ने ५ सामन्यात २२ बळी घेतले, निर्णायक क्षणी हे बळी घेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली तो आता पुढील सामने खेळण्यासाठी चैन्नई येथे रवाना होणार असून त्याच्या या कामगिरीचा शाळेकडून त्याची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्याचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.

पाचोरा शहरातील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम शाळेचा विद्यार्थी शतायु संदीप कुळकर्णी याची १६ वर्षा खालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झालेली होती बीसीसीआय अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना शतायु कूळकर्णी ने ५ सामन्यात २२ बळी घेतले, निर्णायक क्षणी हे बळी घेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली तो आता पुढील सामने खेळण्यासाठी चैन्नई येथे रवाना होणार असून त्याच्या या कामगिरीचा शाळेकडून त्याची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्याचा सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी शतायु चे क्रिडा मार्गदर्शक  सूर्यकांत देवराज व निवृत्ती तांदळे यांचा ही सन्मान करण्यात आला आणि त्यासोबतच यावेळी शतायुची आई श्रीमती सायली कुळकर्णी यांचा देखील सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, सचिव जीवन जैन, सह सचिव संजय बडोला खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव  रितेशजी ललवाणी संचालक संजय चोरडिया तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  पुष्पलता पाटील मॅडम सीईओ अतुल चित्ते हे उपस्थित होते कार्यकमाचे सुत्रसंचालन स्वरूप पाटील यांनी केले कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे