आपल खान्देशमहाराष्ट्र

दादा भुसेचें उदघाटन सुरु असताना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत दिल्या घोषणा ’50 खोके एकदम OK’

साक्री (झूम वृत्तसेवा) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दौऱ्यावर असलेले मंत्री दादा भुसे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवत रोष व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.

बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर होते. यावेळी साक्री तालुक्यातील कासारे येथे विविध कामांच्या भूमिपूजनासाठी जात असताना उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे यावेळी मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी मंत्री भुसेंना डावलत कांदा प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याचे सुचविले.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या कासारे गावात विविध विकास कामांच्या उदघाटनाच्या निमित्ताने बंदरे व खणीकर्म मंत्री दादा भुसे यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.  यावेळी कासारे गावात भुसे आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत रोष व्यक्त केला. कांद्याला भाव मिळत नाही, साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आक्रमक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ’50 खोके, मंत्री ओके’ अशा जोरदार घोषणाही दिल्या. यावेळी उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला.मात्र शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत दादा भुसे यांना दखल घेण्यास भाग पाडले.

दरम्यान शेतकऱ्यांचा रोषाला सामोरे गेलेले दादा भुसे यांनी गाडी थांबवत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला… मात्र आक्रमक आंदोलक काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, मात्र त्यांना मदत होताना दिसत नाही असा आरोप आंदोलकानी केला. शिवाय मंत्री दादा भुसे त्यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी ५० खोके मंत्री ओके अशा जोर जोरात घोषणा यावेळी शेतकर्‍यांनी देत दादा भुसे याचा निषेध केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे