मुंबईत धनगर समाज संघर्ष समितीची राज्यस्तरीय बैठक संपन्न
मुंबई (झूम वृत्तसेवा) धनगर समाज संघर्ष समितीची राज्यस्तरीय बैठक डॉ.महात्मे आय हाॅस्पिटल मुलूंड-मुंबई या ठिकाणी माजी खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर संघर्ष समितीचे प्रदेशध्यक्ष बापुसाहेब शिंदे, सचिव हरिष खुजे, उपस्थित होते.

यावेळी राज्यभरातून धनगर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी खासदार डॉ. महात्मे यांनी सांगितले की संघर्ष समितीची बैठक कोरोना काळानंतर अर्थात दोन वर्षानंतर प्रथमच संपन्न होत असुन त्यांचा आम्हाला आनंद झाला त्यामुळे पदाधिकारींचे आभार मानले व समितीची पुढील वाटचाल धनगर समाजाला न्याय मिळावा यासाठी संघर्ष समितीचा लढा सुरूच राहील धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी सरकारने लवकरात लवकर करावी यासाठी पाठपुरावा केला जाईल. धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी व 22 योजना शासनाने मंजूर केल्या आहेत. त्या योजना समाजात तळागळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम समितीच्या कार्यकर्त्यांनी करावे तळागाळा पर्यंत योजना पोहचल्या की नाही हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापना करण्यात येणार असे डॉ.महात्मे यांनी केले मेंढपाळ व्यवसाय करणारे समाज बांधवांना वनचराई पास मिळाली पाहिजे मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरु राहिल संघर्ष समितीची नविन कार्यकारिणी व मोर्चाबांधणी केली जाईल आणि लवकरच मराठवाड्यात संघर्ष समितीचा मेळावा घेतला जाईल असे सांगितले या वेळेस यावेळेस युवा उपाध्यक्ष सचिन मार्कड यांनी उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघा तर्फे साहेबांना निवेदन दिले, राजेंन्द्र गढरी व गणेश गढरी यानी डॉ महात्मे यांनी जळगाव जिल्ह्यातील आखतवाडे ,बदरखे व मोहळाईला निधी दिल्या बददल आभार मानले. ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष सामितीचे पदाधिकारी संदिप पांढरे, तुषार धायगुडे, संतोष दगडे,उत्तम यमगर, अंकुश उघाडे, संदिप माने, राजुपाल , डॉ हरिष पाल, आण्णासाहेब पवार, रविंन्द्र परदेशी,हेमत परदेशी, संजय कर्वे, रमेश परदेशी, राजेंन्द्र गढरी, गणेश गढरी, संदिप पवार, काल्पना परदेशी, अतुल गढरी, मारुती गाडीकर यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळे कबड्डी पट्टू चि.कोलपे यांच्या साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजातील अनेक बांधवाना नोटरी दिली, भारत खाद्य निगम (एफ सी आय) नेमणुक, रेल्वे बोर्ड व दुरसंचार नियुक्ती केल्या म्हणून पदमश्री माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी व ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी यांनी आपल्या मनोगतात आभार मानले.



