महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला..!
एरंडोल तालुक्यातील जावखेडा गावात महावितरणतर्फे वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक गेले असतात या पथकावर एकाने हल्ला करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे.
पिंपळकोठा विभागांतर्गत जावखेडा गावात अभियंता इच्छानंद पाटील, जनमित्र अक्षय महाजन, पंकज येवले, सुनील महाजन यांचे पथक वीज चोरी विरोधात मोहीम दरम्यान, मनोज प्रताप पाटील या ग्रामस्थाने आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा आकडा काढून टाकल्याने मनोज पाटील यांनी लाडकी दांडक्याने पथकातील सदस्यांना मारहाण केली. या मारहाणीत अक्षय महाजन हे जखमी झाले आहेत. यांनतर जखमी अक्षय महाजन यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सर्व वैद्यकीय महाविद्यालयात अहवाल आल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येईल, असे एरंडोल पीआयने यांनी सांगितले आहे.


