पाचोऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल..
पाचोरा शहरात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व लोक आपल्या घरी गणपतीबाप्पा येणार म्हणुन तयारीला होते , आणि त्यातच पाचोरा शहरात अप्रिय घटनेने सर्वांना धक्का बसला अल्पवयीन मुलीवर तीच्याच घरा समोरील एका 30 वर्षीय व्यक्तीने खाऊचे आमिष दाखून त्याच्या घरात नेऊन चिमुकलीवर अत्याचार केला असून त्यावर पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून.
आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास चार वर्षाची मुलगी आरोपीच्या घरातून रडत रडत घरी आली तिने आरोपीचे नाव सांगत त्याने धमकावत कपडे काढून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन अत्याचार केल्याचे सांगितले. आजु बाजूच्या लोक त्याच्याकडे गेलो असता तो पळून गेला असता. घटनेची माहिती पाचोरा पोलीस स्टेशनला दिली असता सदर आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्यानंतर मुलीला पाचोरा ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून पुढील उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केल्याची फिर्याद दाखल केली.



