आपल खान्देश

पारोळा तालुक्यातील दिव्यांग निधी खर्च करा अन्यथा अर्धनग्न आंदोलन करू!, प्रहार दिव्यांग संघटना आक्रमक


पारोळा (झूम प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींच्या ६०% ग्रामपंचायतींनी दिव्यांग ५% निधी खर्च केला नसल्याचे समोर आल्याने दिव्यांग बांधवांकडून पंचायत समिती बाबत नाराजगी व्यक्त केली आहे. या बाबत कायद्यात कोणतेही प्रावधान नसलेली कारणे दाखवत दिव्यांगांना उडवा उडवीची उत्तरे ग्रामसेवक यांच्याकडून मिळत असल्याने वेळोवेळी प्रहार संघटने कडून निवेदने देऊन देखील ग्रामसेवक यांच्याकडून दिव्यांगांची दिशाभूल करून टाळाटाळ करण्यात येत आहे.

सर्व विषयांबाबत हा फक्त पारोळा तालुक्याचा विषय नसून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अश्याच प्रकारे ग्रामसेवक यांच्याकडून ठोस उत्तरे न मिळत नसल्याने मा.राज्य महासचिव रामदासजी खोत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संस्था जळगांव चे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र चुनीलाल पाटील यांनी पारोळा गटविकास अधिकारी मा.विजय लोंढे साहेब यांना निवेदन देऊन गटविकास अधिकारी यांनी संबधित उत्तर देण्याऱ्या ग्रामसेवकास भ्रमणध्वनी वरून चांगलेच खडसावत दिव्यांगांना योग्य न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले तसेच त्यांना दिव्यांगांची समस्यांबाबत अडचणी सांगून १० दिवसात सकात्मक उत्तर न दिल्यास अर्धनग्न आंदोलन घेण्यात येईल असे लेखी निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील,पदमसिंग गिरासे,प्रकाश पाटील,नवल पाटील,प्रमोद पाटील,बापू सरदार, गणेश पाटील, हेमंत महाजन, लक्ष्मण कसबे इ.उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे