क्रिडा व मनोरंजनदेश-विदेश

राष्ट्रकुल स्पर्धेत संकेत सरगरनं वेटलिफ्टींगमध्ये मोठी कामगिरी देशासाठी रौप्यपदक मिळवलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या संकेत सरगरला ३० लाख रुपयांची आर्थिक मदत घोषणा..

झूम मराठी वृत्त

बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगरनं वेटलिफ्टींगमध्ये मोठी कामगिरी देशासाठी रौप्यपदक मिळवलं आहे. वेटलिफ्टींगच्या 55 किलो वजनी गटात त्यानं हे पदक मिळवलं असून त्याचा कामगिरीची दखल घेत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याला मोठी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या संकेत सरगरला ३० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. तर त्याच्या प्रशिक्षकांनाही साडेसात लाख रुपये राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे.

संकेतनं रौप्यपदक जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचं अभिनंदन करत त्याला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. संकेत सरगर हा मुळचा सांगली जिल्ह्यातील असून त्याच्या वडिलांची चहा आणि पानाची दुकान आहे. संकेतनं अतिशय प्रतिकुल स्थिती स्पर्धेची तयारी करत यश मिळवल्यानं त्याचं देशभरात कौतुक केलं जात आहे. संकेत हा कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाचा इतिहास विभागाचा विद्यार्थी असून त्यानं खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 मध्येही सुवर्णपदकावर नाव कोरलेलं आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे