आपल खान्देशकृषीवार्ता

भडगाव तालुक्यातील लोन व वरखेड शिवारातील वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करा – रिपाई

झूम मराठीवृत्त

भडगाव (संभाजी पाटील) भडगाव तालुक्यातील लोन व वरखेड शिवारातील वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करा अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना रिपाइं च्या वतीने देण्यात आले.

या बाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 7 व 8 तारखेस झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे . प्रशासनाचे काही मोजके शेतकरी यांचेच पंचनामे केले असून खरे नुकसान धारक वंचित राहिले आहेत असे असताना प्रशासनाने कानावर हात ठेवले आहे याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.

तरी प्रशासनाने त्वरित दखल घेत जगाचा पोशिंदा जगला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळाला पाहिजे याबाबत त्वरित दखल न घेतल्यास आपल्या कार्यालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर आण्णा यांच्यासह शेतकरी वाल्मीक पाटील, प्रभाकर नामदेव लोखंडे, भागवत भगवान पाटील, संजय शिवाजी पाटील, हिलाल भिवसन पवार, भाव वसंत पाटील, विजय वसंत पाटील, वाल्मीक महादू पाटील, राजेंद्र दामू पाटील, लोटण चींधू पाटील, अन्नपूर्णा बाई पाटील, भगवान जयसिंग परदेशी,घनश्याम रामसिंग परदेशी, तुळसाबाई रामसिंग परदेशी, विजय रामसिंग परदेशी, किरण जयसिंग परदेशी, रेखाबाई भगवान, परदेशी, सरिता किरण परदेशी, हिरकनबाई ईश्वर पाटील, ईश्वर रामराव पाटील, सुभाष रामराव पाटील, अंकुश सखाराम पाटील, सुरेश सुखदेव पाटील, सुनील राजधर पाटील, माधव रघुनाथ पाटील वाल्मीक तुकाराम पाटील, रमेश गोसावी दगडू ठाकरे, योगेश अशोक पाटील, रामसिंग किसन परदेशी, निलेश अशोक पाटील अंजनाबाई हिरामण यांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे