भूम मध्ये महावितरणच्या विरोधात सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन

जय हनुमान ग्रुपच्या वतीने वतीने भूम मध्ये महावितरणच्या विरोधात सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन.
भूम मध्ये महावितरणच्या वीज कनेक्शन तोडणी व तोडलेली वीज पूर्ववत जोडण्यासाठी भूम मध्ये सर्वपक्षीय आंदोलन पार पडले.
संपूर्ण मतदारसंघात वीज कनेक्शन तोडणीमुळे शेतकरी त्रासले आहेत,याविरोधात आज भूम मधील गोलाई चौकात तासभर रस्ता रोको केल्यानंतर महावितरणच्या वतीने यापुढे वीज कनेक्शन तोडणार नाही व वीज बिल भरण्यासाठी मुदत देणार तसेच अगोदर तोडलेली कनेक्शन जोडणार असे आश्वासन देण्यात आले.
हे दिलेले आश्वासन न पाळल्यास आम्हाला संपर्क करावा असे आवाहन जय हनुमान ग्रुप संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे,तानाजी पाटील,आदम शेख,राजकुमार पाटील,महादेव वडेकर यांनी केले आहे.
यावेळी या रस्ता रोको मध्ये जय हनुमान ग्रुप,संस्थापक अध्यक्ष-सुर्यकांत(सुरेश भाऊ)कांबळे,यावेळी या रस्ता रोको मध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख,भूम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर,परांडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील,परांडा शहराध्यक्ष जहिर चौधरी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख गोरख भोरे,जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील,भूम तालुकाध्यक्ष अमृत भोरे,वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद लगाडे मल्हार आर्मीचे आण्णासाहेब बंडगर उपस्थित होते



