आपल खान्देश

पाचोरा ग्रामीण रूग्णालयाच्या हलगर्जीपणा मुळे बालक दगावल्याने गुन्हा दाखल करावा यासाठी आमरण उपोषण

झूम मराठी वृत्त

पाचोरा शहरातील ग्रामीण रूग्णालयात कर्मचारीच्या हलगर्जी व चुकीच्या उपचारामुळे बालक दगावल्याने संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील सामाजसेवक हरीभाऊ पाटील व कार्यकर्ते हे आज ४ जुलैपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहॆ.

पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या उपचारामुळे दि. १० मे २०२२ रोजी नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाला दूध पावडरचे पेय पाजल्यामुळे बाळाची प्रकृती खालावल्यामुळे सदर बाळाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. यातून बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बाळाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हरीभाऊ पाटील यांनी दि. १३ जुन २०२२ रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात केली होती.

जिल्हा शल्यचिकित्सक जळगांव यांनी संबंधीत उपोषण तुर्त १० दिवस स्थगित करावे असे लेखी पत्र त्यांच्या कर्मचाऱ्याच्या हस्ते देवुन विनंती केल्यामुळे हरीभाऊ पाटील यांनी सुरू असलेले आमरण उपोषण तुर्त १० दिवसांसाठी स्थगित केले होते. परंतु संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक यांनी १० दिवसांच्या केलेल्या विनंती नुसार कोणतीही योग्य कार्यवाही केली नाही आणि तसा १० दिवसांत कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याने तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांना १० दिवसाची म्हणजेच दि. ३ जुलै २०२२ पर्यंत दिलेली वाढीव मुदत संपली तरीसुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांनी मयत बाळाच्या मृत्यूची कोणतीही दखल घेतली नाही. आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही. म्हणून आज दि. ४ जुलै पासुन बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील आपल्या कार्यकर्ते सोबत हे पाचोरा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास पुन्हा बसले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे