क्रिडा व मनोरंजन

ट्विटरवर का ट्रेंड होतं होतं We Love You Salman Khan, जाणून घ्या कारण

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ट्विटरवर ‘वी लव्ह यू सलमान खान’ ट्रेंड होताना दिसत आहे

मुंबई:सलमान खान सध्या त्याचा अलिकडच्याच काळात रिलीज झालेल्या ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड केले आहेत. चित्रपटाला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. असं असताना आता सोशल मीडियावर ‘वी लव यू सलमान खान’ ट्रेंड करत आहे.

 

सलमान खानचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. सलमानच्या चाहत्यांचं त्याच्यावरील प्रेम सर्वांनाच माहीत आहे. आता सलमानचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. ज्यामुळे ट्विटरवर ‘वी लव यू सलमान खान’ ट्रेंड होताना दिसत आहे. यामध्ये चाहत्यांनी त्याच्या सामाजिक कामापासून ते त्याच्या चित्रपटांपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. याशिवाय त्यांनी सलमानला बॉक्स ऑफिस किंग म्हटलं आहे. तर अनेकांनी त्याच्या करोना काळातील मदतीचं कौतुक केलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे