आरोग्य व शिक्षण

कल्याणच्या उसरघर शाळेत डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन

उसरघरने नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या सदस्यत्वाच्या माध्यमातून उसरघर शाळेत डिजिटल लायब्ररी सुरू करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांसह ग्रामस्थांना ज्ञानाचा खजिना उपलब्ध होईल

झूम मराठी वृत्त

कल्याण (प्रतिनिधी) तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा उसरघर येथे आज‌ डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन करण्यात येणार असून तालुक्याचे गटविकास अधिकारी अशोक भवारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भरत पवार हे लायब्ररीचे उद्घाटन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सुनिता मोटघरे ह्या असणार आहेत.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आयआयटी खरगपूरच्या सहाय्याने नॅशनल डिजिटल लायब्ररी सुरू केली असून या लायब्ररीमध्ये भारतातील सर्व भाषांमधील पूर्वप्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंतची तसेच कला, साहित्य, शिक्षण, आरोग्य यासोबतच अनेक विविध विषयांची खूप मोठ्या संख्येने पुस्तके उपलब्ध आहेत.

जि. प. शाळा उसरघरने नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या सदस्यत्वाच्या माध्यमातून उसरघर शाळेत डिजिटल लायब्ररी सुरू करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांसह ग्रामस्थांना ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिला असून उसरघर शाळेतील लायब्ररीचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते होत आहे.

विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते व त्यासाठीच डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती मुख्याध्यापक राहुल परदेशी यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे