धुळ्यातील देवपुरयेथे बालिकेवर लैंगिक अत्याचार!
झूम मराठी
धुळे : खाऊचे अमिष दाखवुन ५६ वर्षीय व्यक्तीने ६ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी देवपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. देवपुरातील कृषी कॉलनीत प्लॉट ५२ मध्ये राहणाऱ्या ६ वर्षीय बालिकेला जवळच भाड्याच्या खोलीत राहणारा बळवंत उर्फ बाबा नथू निकम (५६) रा.कृषी कॉलनी, याने दि.१९ रोजी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान खाऊ देण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीत बोलावुन घेतले व तोंडात बोळा कोंबून बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. भेदरलेली बालिका घरी आल्यावर तिने घडलेल्या घटनेची माहिती पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी बालिकेसह थेट देवपुर पोलिस ठाणे गाठले व पोलिसांना हकीकत सांगितली. याप्रकरणी बालिकेच्या आईने देवपुर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित बळवंत निकमविरुध्द भादंवी कलम ३७६ सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित बळवंत निकम यास ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.



