पिंपळगाव (हरे) पोलीसांची दबंग कार्यवाईत वरखेडीत तांदूळ, गहूने भरलेला महिन्द्रां पीकअप जमा!
गहू तांदुळाने भरलेल्या पिकअपचे गूढ कायम?
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची दबंग कारवाई वरखेडी येथे दिनांक 15/2/2022 रोजी महिंद्रा बोलेरो गाडी क्रमांक MH 19 CY 6321पीकअप वाहन संशयास्पद रित्या उभा असल्याने त्यावर कारवाई करत त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आला आहॆ.
या बाबतीत मिळालेली माहीती अशी की, यावर्षी नव्यानेच रुजू झालेले तात्कालिक एपीआय वाघमारे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी एमएच 19 CY 6321 हा तादुळाने भरलेला महिंद्रा पिकअप पोलिस गस्तच्या वेळी वरखेडी येथे दिसून आला दि 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान या पिकअप मधील पोत्यातील भरलेल्या भाजके गहू 25 गोनी आणि भाजके तादुळाच्या 24 गोण्या आढळून आल्या. या पिककप मध्ये हे गहू तांदूळ प्लास्टिकच्या बारदानने झाकालेले आढळलेत. गोनीतील गहू तांदुळ हे रेशनचे आहेत की व्यापा-यांचे याबाबतीत पण काही उलगडा होत नाही, हे विक्री साठी कुठे जाणार होते याची गूढ पोलीस प्रशासन शोधून काढणार, याबाबतीत गहू, तांदुळाचे सँम्पल पाचोरा तहसीलदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे. प्रयोग शाळेत नमुनाची रिपोर्ट आल्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात रेशन घोटाळा झाल्यामुळे या ट्रक दिवसेंदिवस गुढ वाढत आहे. पुढील कारवाई केली जाणार आहे.


