अहिल्यादेवी स्मारकाकडे जाणारा पडळकरांचा ताफा पोलिसांनी अडवला, चौंडीमध्ये पडळकर समर्थक अन् पोलिसांत खडाजंगी..
झूम मराठी वृत्तसेवा
पुणे: आज अहिल्यादेवी यांची आज जयंती आहे. त्यामुळे आज चौंडी येथे अनेंक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. चौडी येथे राजकीय पक्षाचे नेते सुद्धा हजेरी लावत असतात. थोड्याच वेळा आधी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवरा आले आहेत. मात्र या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे निघाले असताना पोलिसांनी मध्येच त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. यावेळी चौंडीमध्ये पडळकर समर्थक अन् पोलिसांत खडाजंगी झाली आहे.
आज सकाळी श्री क्षेत्र जेजुरी गडावर मल्हारी मार्तंड खंडेराय या देवाचे गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी कार्यकर्त्यांसह दर्शन घेतले. त्यानंतर दोघेही चौंडी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्याच्या गाड्यांचा ताफा अडवला.
आ गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. शरदचंद्र पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार या दोघांनीही अहिल्यादेवींच्या चौंडीमध्ये गलिच्छ पद्धतीने राजकारण केल्याबद्दल मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. मी यात्रेवर ठाम आहे, पोलीस प्रशासनाशी आम्ही कुठल्याही चुकीच्या पद्धतीने वागलेलो नाही. आज आमची यात्रा अहिल्यादेवींच्या चौंडीमध्ये जाण्यापासून कशासाठी अडवताय. यात तुमचा हेतू काय आहे. त्यांची तिकडे सभा आहे, त्या सभेला परवानगी द्यायला पाहिजे नव्हती, कोण शरद पवार? आज त्यांचं वय 82 ते 83 आहे, त्यांना कधी जयंती दिसली नाही. असा सवालच त्यांनी उपस्थीत केला आहे.




